भुसावळ शहरातील ट्रॅकमनचा रेल्वेच्या धडकेने साकेगावनजीक मृत्यू


Trackman in Bhusawal city dies after being hit by a train near Sakegaon भुसावळ : कर्तव्यावर असताना कुठल्यातरी रेल्वे गाडीची जोरदार धडक बसल्याने भुसावळातील रेल्वे ट्रॅकमॅनचा शनिवारी रात्री नऊ वाजता मृत्यू झाला. नितीन हरीशंकर सोनार (42, गडकरी नगर, भवानी माता मंदिराजवळ, भुसावळ) असे मयताचे नाव आहे.

कर्तव्यावर असतानाच अपघाती मृत्यू
भुसावळ तालुक्यातील साकेगाव जवळ वाघूर नदीच्या अलिकडे खांब क्रमांक 448/7/9 मध्ये रेल्वे लाईनीवर नितीन सोनार यांचा मृतदेह आढळला. कर्मचार्‍यांना सोनार यांचा मृतदेह आढळताच त्यांनी रेल्वे प्रशासनाला माहिती कळवली तसेच मृतदेह ग्रामीण रुग्णालयात हलवल्यानंतर डॉ.मयुर चौधरी यांनी शवविच्छेदन केले. त्याच्या भुसावळ तालुक्याचे हवालदार वाल्मीक सोनवणे, जगदीश भोई, रसीद तडवी यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. याप्रकरणी शेख निसार शेख उमर यांनी दिलेल्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक बबन जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली वाल्मीक सोनवणे, संजय भोई करीत आहेत.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !