शिरसाड शेत शिवारात सर्पदंशाने बैल दगावला
A bull was bitten by a snake in Shirsad farm यावल : यावल तालुक्यातील शिरसाड शेत शिवारामध्ये एका बैलाचा सर्पदंश झाल्याने मृत्यू झाला. या दुर्घटनेत शेतकर्याचे 30 हजारांचे नुकसान झाले. एकाच ठिकाणी तीन बैल चरत असताना एका बैलाला सर्पदंश झाला तर दोघे बचावले.
शेतकर्यावर ऐन हंगामात संकट
शिरसाड, ता.यावल येथील लिलाधर काटे यांचे तीन बैल शिरसाड शिवारातील चंद्रकांत पाटील यांच्या शेतात होते. या ठिकाणी शेत बांधावर चरत असतांना या तीन पैकी एका बैलाला सापाने दंश केला. दोघ बैलांना सुरक्षीत ठिकाणी नेण्यात आले तर या घटनेत शेतकर्याचे 30 हजारांचे नुकसान झाले.








