फुलगावात एकाच रात्री दोन ठिकाणी घरफोड्या : 80 हजारांचा ऐवज लंपास
Burglary at two places in one night in Phulgaon : 80 thousand instead of loot भुसावळ : भुसावळ तालुक्यातील फुलगाव येथे एकाच रात्री दोन ठिकाणी बंद घर फोडून सोन्याचे चांदीचे दागिने व रोकड मिळून 80 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लांबवल्याने खळबळ उडाली. ही घटना शनिवार, 9 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजता उघडकीला आली. याप्रकरणी रविवारी 10 सप्टेंबर रोजी वरणगाव पोलीस ठाण्यात वेगवेगळे दोन गुन्हे दाखल करण्यात आले.
एकाच वेळी घरफोडीने खळबळ
भुसावळ तालुक्यातील फुलगाव येथे हेमंत सुभाष चौधरी (35) हे आपल्या परीवारासह वास्तव्याला आहेत. खाजगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतात. शुक्रवार, 8 सप्टेंबर रोजी रात्री 9 ते शनिवारी 9 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास त्यांचे घर बंद असतांना अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून 10 हजारांची रोकड लांबवली.






याच गावातील दीपक गंगाधर पाटील (39) यांच्या बंद घरातून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकुण 70 हजारांचा ऐवज लांबवण्यात आला. दोन्ही घरफोड्यांमध्ये एकूण 80 हजारांचा मुद्देमाल लांबवण्यात आला. हेमंत चौधरी आणि दीपक पाटील यांनी वरणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर रविवारी अज्ञात चोरट्यांविराधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक निरीक्षक आशिकषकुमार अडसुळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किशोर पाटील करीत आहे.


