भुसावळात कोळी समाज विकास मंडळातर्फे गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप

स्पर्धा परीक्षेतील यशातून समाजासह आई-वडिलांचे नाव उज्वल करा : मान्यवरांचा सूर


A pat on the back of the meritorious by Koli Samaj Vikas Mandal in Bhusawal भुसावळ : ध्येय, जिद्द, परीश्रमाच्या त्रिसूत्रीवर विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षेत यश मिळवून समाजासह पालकांचे नाव उज्वल करावे, असा सूर मान्यवरांनी व्यक्त केला. कोळी समाज विकास मंडळातर्फे कोळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा कोळी समाज मंगल कार्यालयात रविवारी आयोजित करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी गुणवंतांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात दहावी, बाारावी, पदवी-पदव्युत्तर तसेच विविध परीक्षेत यश प्राप्त गुणवंतांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. 132 विद्यार्थ्यांचा मंडळाचे स्मृतीचिन्ह प्रशस्तीपत्र आणि महर्षी वाल्मिकी ऋषी यांची प्रतिमा देवून सन्मान करण्यात आला. अध्यक्षस्थानी कैलास लोटू सोनवणे होते. प्रमुख पाहुणे आर.आर.पवार, सेवानिवृत्त मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर, भीमराज कोळी, सतीश सपकाळे, जि.प.च्या माजी सदस्य सुरेखा साळुंके, दत्तात्रय सपकाळे, अभिमन्यू सोनवणे उपस्थित होते.

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करा
आर.आर.पवार म्हणाले की, विद्यार्थ्यांनी युपीएससी व एमपीएससी या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करावा, जगातील महान नेते हे सामान्य परीस्थितीतून वर आले असून विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर सकारात्मक पद्धतीने करावा, असे आवाहन पवार यांनी केले. बी.टी.बाविस्कर म्हणाले की, विद्यार्थ्यांनी अभ्यासात कठोर परीश्रम करून पदवी मिळवून अधिकारी पदापर्यंत यश मिळवावे व समाजाचे तसेच आई-वडीलांचे नाव उज्वल करावे. लीना सपकाळे या विद्यार्थिनीने कोळी समाज विकास मंडळाचे कार्य छान असल्याचे सांगत अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे सांगितले.

यशस्वीतेसाठी यांचे परीश्रम
कोळी समाज विकास मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सोनवणे, उपाध्यक्ष नितीन सोनवणे, वसंत सपकाळे, रवी बाविस्कर, दीपक सोनवणे, भागवत सपकाळे, महारु कोळी, धर्मा कोळी, शांताराम कोळी, विजय तावडे, प्रदीप सपकाळे, संदीप कोळी, नारायण कोळी, संजीवनी भोलाणकर, वंदना कोळी यांच्यासह समाजबांधवांनी परीम घेतले. सूत्रसंचालन चंद्रकांत सूर्यवंशी तर रोहिदास सोनवणे यांनी आभार मानले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !