यावलला कावडधार्‍यांनी केला हर हर महादेवाचा गजर


At Yaval, Kavadharyas raised Har Har Mahadev’s alarm यावल : शहरातील भाविक-भक्तांनी मोठ्या उत्साहात रविवारी तापी नदी व मोर नदीच्या अंजाळे गावाजवळील संगमावरून भव्य कावड यात्रा काढली व शहरातील तारकेश्वर महादेव मंदिर तसेच विस्तारीत भागातील गंगानगरातील गंगेश्वर महादेव मंदिरात मोठ्या उत्साहात कावड यात्रा दाखल झाली. यावलकरांनी हर हर महादेवाच्या गजरात सवाद्य या कावड यात्रेचे स्वागत केले. संत-महंताच्या सहभागाने निघालेल्या कावडयात्रेने नागरीकांचे लक्ष वेधले. यावल शहरातील विस्तारीत असलेल्या गंगानगर व शहरातील तारकेश्वर महादेव मंदिर परीसरातील भाविक-भक्तांनी मोठ्या उत्साहात कावड यात्रा काढली.

हर हर महादेवाचा गजर
पुराणानुसार श्रावण मासात पवित्र नद्यांचे पाणी आणून आपल्या क्षेत्रातील शिवालयात जाऊन जलाभिषेक केल्यास मोक्ष प्राप्त होतो. आपल्या जीवनात कष्ट न राहता सुखाची प्राप्ती होते, घरात धनधान्याची कमतरता राहत नाही, आपल्या सर्व इच्छा, आकांक्षा पूर्ण होतात, संपूर्ण जगात शांतता नांदते, संपूर्ण प्राणीमात्रांचे कल्याण होते या दृष्टीने अंजाळे जवळील तापी व मोर नदीच्या संगमावरून महादेवाचा जयघोष करत पवित्र नद्यांचे पाणी आणून शिवालयात जलाभिषेक करण्याकरीता भव्य कावड यात्रा निघाली. पारंपरीक वाद्य, वृंदाच्या गजरात शहरात दाखल झालेल्या या कावड यात्रेने नागरीकांचे लक्ष वेधले. संत, महंताच्या सहभागाने अबालवृध्द, तरूण मोठ्या संख्येत या कावड यात्रेत सहभागी झाले. बोरावल गेटकडून शहरात दाखल झालेली ही कावड यात्रा शहरातून मार्गस्त होत तारकेश्वर महादेव मंदिरावर पोहोचली. निम्मे भाविक, भक्त हे शहरातून विस्तारीत भागात गंगा नगरात असलेल्या गंगेश्वर महादेव मंदिरात दाखल झाले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !