कुर्‍हा येथे राष्ट्रवादीच्या मुस्लिम कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश


Muslim workers of NCP join BJP in Kurha मुक्ताईनगर : मुक्ताईनगर तालुक्यातील कुर्‍हा येथील अनेक मुस्लिम अल्पसंख्यांक समाजातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. ून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी शहराध्यक्ष साहेब खान उमरखान पठाण, अफसर खान मन्सूर खान पठाण व शेख अशपाक शेख रहमान उर्फ गुल्लू ठेकेदार यांच्यासह वसीम शाह कासम शाह फकीर, उमरखान पठाण, नजीर शाह रसूल शाह फकीर, जुबेर खान अफसर खान, मोहसीन खान अफसर खान, सफदर बेग मिर्झा, रफीक शाह यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी मंत्री गिरीश महाजन खासदार रक्षा खडसे, मुक्ताईनगर विधानसभा निवडणूक प्रमुख अशोक कांडेलकर डॉ.राजेंद्र फडके यांच्या नेतृत्वावर विश्वास करून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
कार्यक्रमास डॉ.राजेंद्र फडके व अशोक कांडेलकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस विनोद पाटील, कुर्‍हा भाजपा शहराध्यक्ष रवींद्रसिंग राजपूत, अल्पसंख्यांक आघाडीचे अजगर खान पठाण, हबीबशाह मेंबर, चंद्रकांत बोराखेडे, रामभाऊ भवरे, जगदेव वाघ, सय्यद समसूद्दीन, अयुब बाबा, साबीर खान, अब्दुल्ला खान, सोपान पेंटर, सलीम मिस्त्री, प्रवीण टेलर, आनंद हिरोळे, अकील खान, जबी उल्ला शा, आसीफ खान, सादिक शा, मतीन खान, कलीम खान यांच्यासह असंख्य भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !