मुक्ताईनगरचे आमदार दमदार : पुराव्यानंतर मिळाली आपत्कालीन बोटचे लोकर्पण
Muktainagar MLA Damdar: Emergency boat launched after evidence मुक्ताईनगर :चांगदेव येथील तापी-पूर्णा संग नावाडी संघटनेच्या मागणीनुसार आमदार चंद्रकांत पाटील यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे बोट मिळण्याबाबत पाठपुरावा केल्यानंतर बोट प्राप्त झाल्यानंतर तिचे लोकर्पण मुक्ताईनगर तहसील कार्यालयात करण्यात आले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार शिंदे, तहसीलदार निकेतन वाढे, तालुकाप्रमुख छोटू भोई, विधानसभा क्षेत्र प्रमुख सुनील पाटील यांची उपस्थिती होती.
अप्रिय घटनेप्रसंगी बोट ठरणार मदतीची
अनेक वर्षांपासून चांगदेव येथील तापी-पूर्णा संगम नावाडी संघटना ही जिल्हाभर जनहिताचे काम करते शिवाय प्रशासनाला विना मोबदला जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यानंतर वा अप्रिय परीस्थितीत स्वतःचा जीव धोक्यात घालून जीव धोक्यात घालून मृतदेह बाहेर काढण्याचे काम करते. चांगदेव-मुक्ताईनगर परीसरात महाशिवरात्रीच्या वेळेस वा एकादशीनिमित्त वारीला येणार्या भाविकांना पाण्याचा अंदाज येत नसल्याने अनेकदा अप्रिय घटना घडत असल्याने अशावेळी ही बोट मदतीसाठी दुवा ठरणार आहे. गतकाळात संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र भोई, सचिव संजय भोई व सर्व सदस्यांनी चांगदेवचे माजी सरपंच पंकज कोळी यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन स्पीड बोट मिळण्याची मागणी केली होती. आमदार पाटील यांनी गत आठवड्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील व मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत आपत्ती व्यवस्थापन निवारण बाबत व उपाय योजनेच्या बैठकीत मागणी केल्यानंतर मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील व पालकमंत्री यांनी जिल्हाधिकार्यांना बोट देण्याची सूचना केली होती व त्यानंतर प्रत्यक्षात मुक्ताईनगर उपविभागीय अधिकारी कार्यालयामार्फत आमदार चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते लोकार्पण केल्यानंतर ही बोट संघटनेच्या स्वाधीन करण्यात आली. या संघटनेच्या युवकांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापनामार्फत 15 दिवसाचे जिल्हास्तरावर प्रशिक्षण सुध्दा देण्यात आले.

यांची छोटेखानी कार्यक्रमास उपस्थिती
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार शिंदे, तहसीलदार निकेतन वाढे, शिवसेना तालुकाप्रमुख छोटू भोई, विधानसभा शेत्रप्रमुख सुनील पाटील, चांगदेवचे सरपंच निखील बोदडे, माजी सरपंच पंकज कोळी, महेंद्र कोळी व संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र भोई, सचिव संजय भोई व सदस्य व शासकीय अधिकारी उपस्थित होते.

