मेगाब्लॉकचा फटका : महाराष्ट्र एक्स्प्रेस धावणार वर्ध्यापर्यंत


भुसावळ : गोंदिया रेल्वे स्थानकाजवळ सुरू असलेल्या कामामुळे रेल्वे प्रशासनाने मेगाब्लॉक घेतल्याने डाऊन कोल्हापूर गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस ही गाडी फेब्रुवारी महिन्यातील दर सोमवारी गोंदिया ऐवजी वर्धा रेल्वे स्थानकापर्यंतच धावणार आहे. अप मार्गावरील महाराष्ट्र एक्स्प्रेस ही गाडी दर बुधवारी महिनाभर वर्धा स्थानकावरून सुटणार आहे. गोंदिया स्टेशन येथे मेगाब्लॉक असल्यामुळे महाराष्ट्र एक्सप्रेस ही वर्धा येथे शॉर्ट टर्मिनेट करण्यात आली आहे. गाडी क्रमांक 11039 डाउन कोल्हापूर गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस ही दर सोमवारी (3, 10, 17 व 24) या दिवशी गोदिंया येथे न जाता वर्धा येथे शॉर्ट टर्मिनेट करण्यात आली आहे. तसेच गाडी (11040) अप गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस ही गाडी बुधवारी (दि.5, 12, 19 व 26) या दिवशी गोंदिया स्टेशनवरून न सुटता वर्धा स्थानकावरून सुटणार आहे. ही गाडी आपल्या नियमितच्या वेळेतच धावेल. प्रवाशांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !