अवैध गौण खनिजासह महसूल वसूलीत रावेर तहसील अव्वल


48 लाखांची वसुली : तहसीलदार उषाराणी देवगुणे यांची दमदार कामगिरी

रावेर : शेतकर्‍यांच्या योजना असो की सततचे निवेदन नद्यांना पोखरणारी अवैध टॅक्टर-ट्रॉली असो की महसूलची वसुली या सर्व स्तरावर कमी असलेल्या कार्यालयीन स्टॉपला सोबत घेऊन महसूल विभागाची तालुक्यात छाप सोडणार्‍या महिला तहसीलदार उषाराणी देवगुणे संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय ठरल्या आहे. त्यांनी अवैध गौणखनिजच्या माध्यमातून एप्रिल ते डिसेंबर दरम्यान रेकॉर्डब्रेक वसुली केली आहे. महिला तहसीलदार असतानाही त्यांनी आपल्या कामाची छाप सोडली आहे. सातत्याने सुरू असलेल्या अवैध वाळू माफियांविरूद्धच्या कारवाईने वाळू माफियांचे त्यांनी धाबे दणाणून सोडले आहे.

तहसीलदारांच्या कार्याची सर्वत्र चर्च
शेतकर्‍यांना येणार्‍या सर्व निधी त्यांनी तत्काळ शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्ग करून जिल्ह्यात नावलौकीक मिळवला आहे. या कामासाठी त्यांना नायब तहसीलदार संजय तायडे यांची मोलाची साथ लाभत आहे. तायडे यांनी यापूर्वी रावेर तालुक्यात काम केले असल्याने त्यांना तालुक्याची इत्यंभूत माहिती आहे. शेतकर्‍यांसंदर्भातील समस्या असो की योजना, मोर्चा असो नागरीकांच्या भेटी-गाठी सर्वांना समजूत घालण्यात तहसीलदार देवगुणे व नायब तहसीलदार तायडे अग्रसर ठरतात. त्यांची हिच काम करण्याची अष्टपैलु कामगिरी संपूर्ण जिल्ह्यात चर्चेची ठरली आहे.

शेतकर्‍यांना दिलाय योजनांचा लाभ
पीएम किसान, दुष्काळ निधी, ओला दुष्काळाचा निधी जिल्हा सर्वात आधी शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्ग करण्याने कामदेखील रावेर महसूल विभागाने चोखपणे बजावले आहे. रावेर महसूल विभागाचे टार्गेट अवैध वाळू वाहतूकदार असून कारवाईसोबतच दंड वसुलीच्या कामासाठी येथील तहसीलदारांच्या मार्गदर्शना खाली निवासी नायब तहसीलदार संजय तायडेदेखील अहोरात्र झटत आहे.

33 लाखांचा तगडा दंड वसुल
एप्रिल ते डिसेंबर दरम्यान तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी वाळूचे 36 तर डबरच्या दोन तसेच मातीच्या पाच वाहनांवर कारवाई करीत तब्बल 47 लाख 55 हजार दंड केला असून आहे त्यापैकी 33 लाखांचा दंड वसूल झाला आहे. शासकीय कामात अडथळा निर्माण करणार्‍यांविरुद्ध तीन गुन्हेदेखील दाखल करण्यात आले असून 39 वाहने जप्त करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे आता पर्यंतची रेकॉर्डब्रेक वसुली महसूल विभागाने केल्याचे सूत्रांनी सांगितले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !