जळगावात फुले मार्केटमध्ये पानटपरीला आग


Pantapari fire in Phule market in Jalgaon जळगाव : शहरातील फुले मार्केटच्या बाजूला स्वच्छता गृहाजवळील टपरीला बुधवारी मध्यरात्रीनंतर अचानक आग लागून त्यातील विक्रीचा माल जळाला. या घटनेत सुमारे दोन हजार रुपयांचे नुकसान झाले. बुधवार, 4 रोजी मध्यरात्रीनंतर ही घटना घडली.

आगीत दोन हजारांचे नुकसान
प्रिया जितू सारवान (35) हे शनिपेठ परीसरात वास्तव्यास आहेत. त्यांची फुले मार्केट परीसरात पानटपरी आहे. बुधवारी रात्री नेहमीप्रमाणे त्यांनी टपरी बंद करीत घर गाठले. मध्यरात्रीनंतर पान टपरीला आग लागली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर काही प्रत्यक्षदर्शींनी ही आग पाणी मारुन विझविली. तसेच या घटनेची माहिती जितू सारवान यांना मोबाईलवरुन दिली. तपास हवालदार अलका वानखेडे करीत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !