चेन्नईसह महाराष्ट्र एक्स्प्रेसचा गोंदिया आरक्षीत कोच रद्द
भुसावळ : दौंड रेल्वे स्थानकावरील प्लॅटफार्म क्रमांक तीन अणि चारची लांबी वाढवण्याच्या कामामुळे डाऊन 11028 चेन्नई एक्सप्रेसला जोडण्यात येणारा सोलापूर-गोंदिया आरक्षित कोच 31 जानेवारी ते 31 मार्चदरम्यान रद्द करण्यात आला आहे शिवाय अप 11040 महाराष्ट्र एक्सप्रेसला जोडण्यात येणारा गोंदिया-सोलापूर आरक्षित कोच 31 जानेवारी ते 31 मार्चदरम्यान रद्द करण्यात आलेला आहे. या कामांमुळे होणार्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली असून सहकार्याचे आवाहन प्रवाशांना केले आहे.


