22 एक्स्प्रेस गाड्यांना अतिरीक्त स्लीपरसह वातानुकूलित बोगी


रेल्वे प्रवाशांना दिलासा : गर्दीच्या हंगामात गैरसोय रोखण्यासाठी निर्णय

भुसावळ : फेब्रुवारी व मार्च महिन्यात रेल्वे गाड्यांना सुट्यांमुळे होणारी गर्दी व रेल्वे प्रवाशांची गैरसोय पाहता तब्बल 22 एक्स्प्रेस गाड्यांना प्रारंभिक स्थानकांपासून स्लीपर तसेच टू व थ्री टायर वातानुकूलित जादा बोगी लावण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

या गाड्यांना लागणार जादा बोगी
डाऊन 19063 उधना-दानापूर एक्सप्रेसला 1 ते 29 फेबु्रवारीदरम्यान एक वातानुकूलित दोन टियर, एक वातानुकूलित थ्री टियर, दोन स्लीपर बोगी लावण्यात येतील. अप 19064 दानापूर-उधना एक्स्प्रेस 2 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान एक वातानुकूलित दोन टियर, एक वातानुकूलित थ्री टियर, दोन स्लीपर कोच लावण्यात येतील. अप 19058 वाराणसी-उधना एक्स्प्रेसला 9 फेब्रुवारी ते 1 मार्चदरम्यान एक वातानुकूलित दोन टियर, एक वातानुकूलित थ्री टियर, दोन स्लीपर कोच लावण्यात येतील. डाऊन 19057 उधना-वाराणसी एक्स्प्रेसला 7 ते 28 फेब्रुवारीदरम्यान एक वातानुकूलित टू टियर, एक वातानुकूलित थ्री टियर, दोन स्लीपर कोच लावण्यात येतील. डाऊन 22967 अहमदाबाद-अलाहबाद एक्स्प्रेसला 8 ते 27 फेब्रुवारीदरम्यान एक वातानुकूलित थ्री टियर, एक शयनयान श्रेणी स्लीपर कोच लावण्यात येईल. अप 22968 अलाहाबाद-अहमदाबाद एक्सप्रेसला 7 ते 28 फेब्रुवारीदरम्यान एक वातानुकूलित थ्री टियर, एक स्लीपर कोच लावण्यात येईल. डाऊन 22937 राजकोट-रीवा एक्स्प्रेसला 2 ते 23 फेबु्रवारीदरम्यान एक स्लीपर कोच लावण्यात येईल.अप 22938 रीवा-राजकोट एक्स्प्रेसला 3 ते 24 फेब्रुवारीदरम्यान एक स्लीपर कोच लावण्यात येईल. डाऊन 19051 बलसाड-मुजफ्फरपूर श्रमिक एक्स्प्रेसला 1 ते 29 फेब्रुवारीदरम्यान एक स्लीपर कोच लावण्यात येईल. अप 19052 मुजफ्फरपुर-बलसाड श्रमिक एक्सप्रेसला 3 फेब्रुवारी ते 3 मार्चदरम्यान एक स्लीपर कोच लावण्यात येईल. डाऊन 12943 बलसाड-कानपूर एक्स्प्रेसला 5 ते 28 फेब्रुवारीदरम्यान एक स्लीपर कोच लावण्यात येईल. अप 12944 कानपूर-बलसाड एक्स्प्रेसला 7 ते 28 फेब्रुवारीदरम्यान एक स्लीपर कोच लावण्यात येईल. डाऊन 12949 पोरबंदर-सांत्रागाच्छ कविगुरु एक्स्प्रेसला 7 ते 28 फेब्रुवारीदरम्यान एक वातानुकूलित थ्री टियर व एक स्लीपर कोच लावण्यात येईल. अप 12950 सांत्रागाच्छी- पोरबंदर कविगुरु एक्सप्रेसला 9 फेब्रुवारी ते 1 मार्चदरम्यान एक वातानुकूलित थ्री टियर व एक स्लीपर कोच लावण्यात येईल. डाऊन 12905 पोरबंदर-हावडा एक्स्प्रेसला 2 ते 27 फेब्रुवारीदरम्या एक वातानुकूलित थ्री टियर कोच लावण्यात येणार आहे. अप 12906 हावडा-पोरबंदर एक्स्प्रेसला 4 ते 29 फेबुवारीदरम्यान एक वातानुकूलित थ्री टियर कोच लावण्यात येईल. डाऊन 22939 हापा-बिलासपूर एक्स्प्रेसला 4 ते 29 फेब्रुवारीदरम्यान एक वातानुकूलित थ्री टियर कोच लावण्यात येईल. अप 22940 बिलासपुर- हापा एक्स्प्रेसला 6 ते 27 फेब्रुवारीदरम्यान एक वातानुकूलित थ्री टियर कोच लावण्यात येईल. डाऊन 22973 गांधीधाम-पूरी एक्स्प्रेसला 5 ते 28 फेब्रुवारीदरम्यान एक वातानुकूलित थ्री टियर कोच तसेच दोन स्लीपर कोच लावण्यात येईल. अप 22974 पूरी-गांधीधाम एक्स्प्रेसला 8 ते 29 फेब्रुवारी दरम्यान एक वातानुकूलित थ्री टियर कोच, दोन शयनयान श्रेणी स्लीपर कोच लावण्यात येणार आहे. डाऊन 12993 गांधीधाम-पूरी एक्स्प्रेसला 7 ते 28 फेब्रुवारीदरम्यान एक वातानुकूलित थ्री टियर कोच तसेच दोन स्लीपर कोच लावण्यात येईल. अप 12994 पूरी-गांधीधाम एक्स्प्रेसला 10 फेब्रुवारी ते 2 मार्चदरम्यान एक वातानुकूलित थ्री टियर कोच तसेच दोन स्लीपर कोच लावण्यात येईल




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !