जळगावात भुरट्या चोरट्यांचा उच्छाद : रीक्षाचे टायरसह डीक्स लांबवले


Scattered thieves in Jalgaon : Deeks were stretched with rickshaw tires जळगाव : शहरात भुरट्या चोरट्यांनी उच्छा मांडला असून इंद्रप्रस्थनगरात असलेल्या रीक्षाचे टायर तसेच डिक्स लांबवण्यात आल्याची बाब उघडकीस आली आहे. हा प्रकार शनिवार, 14 रोजी मध्यरात्रीनंतर घडला. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

रीक्षा चालकावर कोसळले संकट
शेख अफसर शेख सत्तार (25) हे रीक्षा चालक असून दुध फेडरेशन रोड भारतनगर येथे राहतात. त्यांनी रीक्षा इंद्रप्रस्थनगरात नगरसेवक दांडेकर मामा यांच्या घराजवळ लावली होती. चोरट्यांनी मध्यरात्रीनंतर या रीक्षाचे टायर तसेच डीस्क काढुन सुमारे 21 हजारांचे साहित्य लांबवले. पोलिस निरीक्षक अनिल भवारी यांच्यासह कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. तपास हवालदार विजय निकुंभ करत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !