वरणगावातील रेणुका नगरात घरफोडी
भुसावळ : तालुक्यातील वरणगाव येथील रेणुकानगरातील रहिवासी मनोहर नारायण कोळी (41) लग्नासाठी 31 जानेवारीला बाहेरगावी गेल्याने 5 फेब्रुवारीपर्यंत घराला कुलूप असल्याची संधी चोरट्यांनी साधत घरातील 43 हजारांच्या मुद्देमालावर डल्ला मारला. या प्रकरणी वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. कोळी हे घरी परतल्यानंतर त्यांना घराचा कडी कोयंडा तुटलेला तसेच सामान अस्तावस्त फेकलेला आढळला. घरातील सोन्याचे दागिने व रोख 20 हजार रुपये, मोबाईल असा एकूण 43 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला.


