रावेरात कर्मचार्याची त्रासाला कंटाळून आत्महत्या : भारती ज्वेलर्सच्या मालकाविरोधात गुन्हा
Raverat employee commits suicide due to stress : Crime against owner of Bharti Jewellers रावेर : शहरातील ज्वेलर्सच्या दुकानातील काम सोडल्यानंतरही ज्वेवर्स मालकाकडून त्रास कायम असल्याने त्यास कंटाळून 40 वर्षीय युवकाने शुक्रवारी आत्महत्या केली. याप्रकरणी भारती ज्वेलर्सच्या तीन्ही मालकाविरुध्द रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
धमकीला कंटाळून केली आत्महत्या
रावेर शहरातील कासार गल्लीतील रहिवासी किशोर सैतवाल (40) हा शहरातील भारती ज्वेलर्समध्ये कामाला होता. काही कारणास्तव त्याने ज्वेलर्स दुकानातील काम सोडले मात्र भारती ज्वेलर्सचे मालक करण गणवानी, अनुराग गणवानी व महेश गनवाणी यांनी 22 मार्च 2023 ते 27 ऑक्टोबर 2023 या दरम्यान किशोर यास वेळो-वेळी मोबाईलवर तसेच प्रत्यक्ष घरी जाऊन, किशोरचा भाऊ, आई यांच्या मोबाईलवर तसेच काम करत असलेल्या ठिकाणी जाऊन आमच्याकडे कामाला परत ये नाही तर तुझ्यावर चोरीचा आरोप ठेऊन समाजात बदनाम करू व तुला कुठेही काम मिळवु देणार नाही, अशी धमकी किशोर यास दिली. किशोरला एकदा घराजवळ येऊन मारहाण करण्यात आल्याने किशोर नैराश्याच्या गर्तेत गेला होता. भारती ज्वेलर्सच्या तिघा मालकांकडून होणार्या त्रासाला कंटाळुू त्याने शुक्रवारी घराच्या छतास दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत मयताची आई रत्नाबाई सैतवाल यांनी देलेल्या फिर्यादीवरुन भारती ज्वेलर्सच्या तिंघा मालकाविरुध्द रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सचिन नवले, कॉन्स्टेबल संभाजी बिजागरे करीत आहे.

