कंत्राटी कामगारांचा 1 रोजी मंत्रालयावर मोर्चा


भुसावळ : ऊर्जा खात्यातील कंत्राटी कामगारांना सतत भेडसावत असलेल्या समस्यांकडे कामगार अधिकार्‍यांनी त्वरीत तपासणी करून दोषी कंत्राटदारांवर व मुख्य नियोक्त्यांवर कठोर कारवाई करावी अन्यथा 1 नोव्हेबरला मंत्रालय मुंबई येथे मोर्चा अटळ असल्याचा निर्धार लेबर ऑफिस, पुणे संगमवाडी येथे लाक्षणिक निदर्शनेाच्या वेळी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ (संलग्न भारतीय मजदूर संघ) चे अध्यक्ष निलेश खरात यांनी मार्गदर्शन करताना केला. पुण्याचे अपर कामगार कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ आणि कामगार उपायुक्त अभय गीते यांना वीज कंत्राटी कामगार संघाच्या वतीने निवेदन देण्यात आले. वीज कंत्राटी कामगारांची कंत्राटी पद्धतदेखील बंद करावी, या मागणीसाठी भारतीय मजदूर संघाच्या महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या वतीने त्यांना अनेकदा निवेदने देण्यात आली आहेत. मोर्चात सहभागाचे आवाहन प्रदेश अध्यक्ष निलेश खरात, प्रदेश सरचिटणीस सचिन मेंगाळे, प्रदेश उपाध्यक्ष सचिन भावसार आदींनी केले आहे.












मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !