भुसावळातील कोळी समाजबांधवांचा अकलदूजवळ दोन तास रास्तारोको

जात वैधता प्रमाणपत्राची मागणी : आंदोलनामुळे महामार्ग दोन तास ठप्प


The Koli community members of Bhusawla held a roadblock for two hours near Akaldud
भुसावळ :
आदिवासी कोळी महादेव, कोळी मल्हार, कोळी ढोर, टोकरे कोळी जमातीचे आंदोलनातील मागण्या मान्य करण्यासाठी शनिवारी कोळी समाजबांधवांनी भुसावळ यावल व फैजपूर मार्गावर तापीपुलाच्या अकलूद भागात दोन तास रास्तारोको आंदोलन केल्याने दोन किलोमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर तब्बल दोन तासांनी आंदोलन मागे घेतल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

खरे हक्कदार वंचित
अनुसूचित जमातीत टोकरे कोळी, कोळी ढोर, कोळी महादेव, कोळी मल्हार या जमातीचा समावेश आहे. सन 1950 पूर्वीचे शालेय व जन्माच्या नोंदी या जनगणना नियमाप्रमाणे झाल्या असून महाराष्ट्र शासनाने 10 ऑक्टोबर 1967 इतर मागासवर्गाचे सूचीमध्ये कोळी व 18 डिसेंबर 1994 चे सूचीमध्ये कोळी, तत्सम जाती असा उल्लेख केल्यामुळे अनुसूचित जमातीचे खरे हक्कदार असलेले वंचित राहिले आहेत. या संदर्भात कोळी समाज बांधवांनी आरक्षणाच्या मागणीसाठी शनिवारी भुसावळ-यावल फैजपूर मार्गावर रास्तारोको आंदोलन केले. आंदोलनाच्या ठिकाणी संतप्त समाजबांधवांनी वाल्मिक जयंती प्रतिमा पूजन करीत साजरी केली. आंदोलनाचे नेतृत्व जितेंद्र सपकाळे, प्रकाश कोळी यांनी केले. यावेळी भुसावळ, यावल, रावेर तालुक्यातील पदाधिकारी व कोळी समाजबांधव उपस्थित होते.

या आहेत प्रमुख मागण्या
कोळी नोंदीवरून टोकरे कोळी, कोळी ढोर कोळी महादेव कोळी मल्हार जमातीचे गटाला वैधता, व प्रमाणपत्र देण्यात यावे, गर्व्हमेंट ऑफ इंडिया अ‍ॅक्ट 1935 चे कायद्याप्रमाणे दिलेले पात्रता वैधता जसे की, इनाम वर्ग 6 ब ची जमीन, कुळ कायद्याची शेत जमीन, कोणताही सन 1950 पूर्वीचा 7/12 उतारा व प्रमाणपत्र देण्यात यावे, 13 ऑक्टोबर 1967 मधील ओबीसी व एसबीसीमधील कोळी हे असंविधानिकरीत्या समाविष्ट करण्यात आलेल्या आहे, असे जाहीर करून एसबीसीचे सूचीमधून त्यांना वगळण्यात यावे आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.












मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !