राज्यस्तरीय गणित महोत्सवात वरणगावचे सुनील वानखेडे यांचा सहभाग


भुसावळ : गुजरात राज्यातील भावनगर जिल्ह्यात पालीताना येथे सतरावे गुजरात राज्यस्तरीय गणित महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवाला वरणगाव येथील महात्मा गांधी विद्यालयाचे उपशिक्षक तथा एपीजे अब्दुल कलाम नॅशनल कौन्सिल ऑफ यंग सायंटिस्ट व्हा.चेअरमन सुनील वानखेडे यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रीत करण्यात आले. भुसावळ तालुका जिल्हा स्तरावरून विविध गणिताचे मॉडेल्स राज्यस्तरासाठी निवडण्यात आले होते. या मॉडेलचे प्रदर्शनी पालीताना, जि.भावनगर येथील संदीपाना पब्लिक स्कूलमध्ये करण्यात आले. या कार्यक्रमाला गुजरात राज्याचे शिक्षण विभागाचे जॉईंट डायरेक्टर बहादुरसिंग सोलंकी रमण सायन्स टेक्नॉलॉजी फाउंडेशनचे चेअरमन डॉ.चंद्रमौली जोशी भोपाळ येथील मॅथेमॅटिशन मोहनसिंग सोलंकी चलाला येथील वुमन्स कलाम चिल्ड्रन सायंटिस्ट सेंटरचे संचालक महेशभाई पटेल ऑल इंडिया रामानुजन मॅथ क्लबचे राज्य समन्वयक कल्पेश अखानी सचिव दर्शन मेहता संदीपना स्कूलचे संचालक आशिष भाई मेहता आदी उपस्थित होते.

विजयी स्पर्धकांचा गौरव
गुजरातमधील पारंपरीक पद्धतीने मान्यवरांचा गौरव करण्यात आला. यानंतर बोलताना बहादुरसिंग सोलंकी म्हणाले की, संपूर्ण देशातील महाविद्यालयीन शिक्षण एकसमान झाले पाहिजे यासाठी अभ्यासक्रमाची निर्मिती सुरू आहे तसेच येणार्‍या नवीन शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना देणारे विविध कृती पुस्तिकेत दिल्या असून यामुळे विद्यार्थ्यांना आनंदी शिक्षण मिळणार आहे.सुनील वानखेडे यांनी एपीजे अब्दुल कलाम नॅशनल कौन्सिल ऑफ यंग सायंटिस्टच्या माध्यमातून देश स्तरावरून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत गणित-विज्ञान यामधील कठीण वाटणार्‍या संकल्पना सोप्या करण्यासाठी विविध प्रकारच्या कार्यशाळा घेऊन शिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत आहेत. तीन लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांपर्यंत या संस्थेच्या माध्यमातून गणित सरळ आहे ही संकल्पना समजावून सांगितली. यानंतर राज्यभरातून आलेल्या विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी गणित विषयावरील विविध संबोध स्पष्ट करणारे बोलके मॉडेल तयार केले होते तर चंद्रयान तीनमधील रॉकेटचे हुबेहूब मॉडेल या ठिकाणी या प्रदर्शनीचे आकर्षण ठरले. या ठिकाणी सायंटिस्ट कॅरेक्टर प्ले रोल मॅथ क्विझ मॅथ मॉडेल प्रेसेंटेशन या स्पर्धेत विजयी झालेल्या विद्यार्थ्यांना गोल्ड सिल्व्हर व ब्राँझ मेडल सोबत प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.

सुनील वानखेडे यांची उपस्थिती
गुजरात राज्यस्तरीय गणित महोत्सवासाठी महाराष्ट्रातून एपीजे अब्दुल कलाम नॅशनल कौन्सिल ऑफ यंग सायंटिस्ट चेअरमन सुनील वानखेडे यांना प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी आमंत्रित करण्यात आले होते. त्यांच्या हस्ते या ठिकाणी मॅथ मॉडेल प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले. ही बाब नक्कीच जळगाव जिल्ह्यासाठी गौरवास्पद आहे.












मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !