भुसावळसह बोदवडला मुद्रांक विक्रेत्यांचे धरणे आंदोलन : शासनाच्या लाखोंच्या महसूलावर पाणी

मुद्रांक विक्रेत्यांना हवे दहा टक्के कमिशन : शंभर व पाचशे रुपयांचे स्टॅम्प बंद न करण्याची अपेक्षा


Bhusawal and Bodwadla Stamp Sellers’ Dharna Movement : Water on Government’s Revenue of Lakhs भुसावळ : शंभर व पाचशे रुपयांचे स्टॅम्प बंद न करण्यासह वारसांना परवाने हस्तांतरीत करून मिळावे, मुद्रांक विक्रेते यांना तीन ऐवजी 10 टक्के कमिशन मिळावे अथवा सेवा शुल्क आकारण्यास परवानगी मिळावी, मुद्रांक विक्रिची मर्यादा दहा हजारांवरून एक लाख करण्यात यावी, स्टँप विक्रीकरीता मदतनीस ठेवण्यास परवानगी मिळावी यासह 500 व 100 रुपयांचे जनरल मुद्रांक रद्द करुन सदरचे मुद्रांक हे बँकेमार्फत व फ्रँकिंगव्दारे विक्री करण्यासंदर्भात निर्णय रद्द करावा आदी मागण्यांसाठी भुसावळ विभागात मुद्रांक विक्रेत्यांनी सोमवारी कामबंद आंदोलन केल्याने शासनाच्या लाखोंच्या महसुलावर पाणी फेरले गेले. भुसावळा मुद्रांक विक्रेत्यांनी काम बंद आंदोलन करीत प्रशासनाला निवेदन दिले तर बोदवड शहरात धरणे आंदोलन करण्यात आले.

बोदवडला धरणे आंदोलन
बोदवड :
अखिल महाराष्ट्र मुद्रांक समितीच्या वतीने बोदवड तालुक्यातील मुद्रांक विक्रेत्यांनी बोदवड तहसील कार्यालयाबाहेर सोमवारी एक दिवसीय धरणे आंदोलन केले. मुद्रांक विक्रेत्यांनी शंभर व पाचशे रुपयांचे स्टॅम्प बंद न करण्यासह वारसांना परवाने हस्तांतरीत करून मिळावे, मुद्रांक विक्रेते यांना तीन ऐवजी 10 टक्के कमिशन मिळावे अथवा सेवा शुल्क आकारण्यास परवानगी मिळावी, मुद्रांक विक्रिची मर्यादा दहा हजारांवरून एक लाख करण्यात यावी, स्टँप विक्रीकरीता मदतनीस ठेवण्यास परवानगी मिळावी, शासनाने मुद्रांक छपाई बंद केल्याने ती सुरू करावी आदी मागण्या करण्यात आल्या. यावेळी बोदवड तालुक्यातील मुद्रांक विक्रेता संघटनेचे अध्यक्ष रमेश चौधरी, दत्तात्रय पाटील, बापू चौधरी, प्रल्हाद सोनार, भागवत वंजारी, संजय सोनवणे, पुंडलिक वेरुळकर, गणेश जोगी, घनश्याम घुले, किशोर चौधरी, योगेश वेरुळकर आदी उपस्थित होते.

भुसावळात शासनाचे लाखोंचे नुकसान
भुसावळ : विविध न्याय मागण्यांसाठी शासनमान्य मुद्रांक विक्रेता व दस्तलेखक संघाने सोमवारी दुय्यम निबंधक कार्यालयाजवळ धरणे आंदोलन करीत काम बंद आंदोलन केल्याने मुद्रांक उपलब्ध होवू शकले नाही तर दुय्यक निबंधक कार्यालयात होणारी दैनंदिन दस्त नोंदणी बंद झाल्याने लाखोंच्या महसूलावर पाणी फेरले गेले.

शहरातील 28 विक्रेत्यांचा सहभाग
भुसावळ शहरातील सर्व 28 मुद्रांक विक्रेते व दस्तलेखकांनी आंदोलनात सहभाग नोंदवला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष किशोर अडकमोल, मुद्रांक विक्रेते किरण राजपूत, नारायण महिरे, आनंद तायडे, शे.सलीम, शे. कासीम, भास्कर बोरवणकर, देविदास सोनवणे, अशोककुमार मुराई, मनोज भालेराव, प्रमोद इंगळे, राजेद्र सालकर, मिलींद कुलकर्णी, प्रतापराव शिंदे, ्प्रशांत नाईक, भालचंद्र चव्हाण आदींसह शहरातील सर्व मुद्रांक विक्रेते उपस्थित होते. दरम्यान, शासनाने निर्णय मागे घेतला नाही तर पुन्हा तीव्र आंदोलनाचा इशारा मुद्रांक विक्रेत्यांनी दिला आहे.












मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !