मराठा आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण : बीडमध्ये संचारबंदी ; 72 बसेस फोडल्या


Maratha Reservation Movement Turns Violent: Curfew in Beed; 72 buses were smashed बीड : मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी राज्यात वातावरण पेटले असून आतापर्यंत बीडमध्ये सर्वाधिक 72 बसेस फोडण्यात आल्या असून सार्वजनिक व खासगी मालमत्तेचे नुकसान झाल्याने जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी सोमवारी रात्री आठ वाजता तत्काळ संचारबंदी लागू केली आहे. बीडमध्ये 1 नोव्हेंबरपर्यंत इंटरनेट बंद ठेवण्यात आले असून बीडमध्ये एसआरपीएफच्या पाच तुकड्या दाखल झाल्या आहेत. रात्री बीड एसटी डेपोतील 72 बसेसची तोडफोड करण्यात आली आहे. परीस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी मराठवाडा रेंजचे पोलिस महानिरीक्षक चव्हाण बीडमध्ये दाखल झाले आहेत.

राष्ट्रीय महामार्गावरही आदेश लागू
संचारबंदी आदेशानुसार बीड जिल्हा मुख्यालय व सर्व तालुका मुख्यालयापासून पाच किलोमीटरच्या हद्दीपर्यंत सर्व राष्ट्रीय महामार्गावर पुढील आदेशापर्यंत हा आदेश लागू राहणार आहे. सातार्‍यामध्ये जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सातारा जिल्ह्यात आज बंदची हाक देण्यात आली आहे. मंगळवारी पुकारण्यात येणार्‍या बंद मध्ये सातारा जिल्ह्यातील अत्यावश्यक सुविधा वगळता सर्वकाही बंद राहणार आहे. हा बंद अगदी शांततेत पार पाडावा असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी केले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !