जबरी चोरीतील पसार आरोपी शेरू अली इराणी पोलिसांच्या जाळ्यात
भुसावळ : चैन चोरीच्या गुन्ह्यातील अट्टल आरोपी शेरू अली सल्तनत अली इराणी (28, रा.पापानगर, भुसावळ) हा न्यायालयीन तारखेवर सातत्याने गैरहजर राहत असल्याने त्याच्याविरुद्ध पकड वॉरंट काढण्यात आले होते. बाजारपेठ पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, बाजारपेठ निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप परदेशी, एएसआय तस्लीम पठाण, हवालदार अयाज सैय्यद, नाईक चंद्रकांत बोदडे, नेव्हील बाटली, रमण सुरळकर, विकास सातदिवे, उमाकांत पाटील, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी आदींच्या पथकाने केली.


