बोदवड येथे मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ एक दिवसीय लाक्षणिक उपोषण


बोदवड : बोदवड तालुक्यातील सकल मराठा समाजाच्यावतीने मराठ्यांचे क्रांतीसूर्य मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षण लढ्याच्या समर्थनार्थ बुधवार, 1 रोजी सकाळी 11 ते सायंकाळी पाच दरम्यान एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. सकल मराठा समाज बोदवड तालुक्याच्यातर्फे वतीने महाराष्ट्रातील सर्व मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रवर्गात समाविष्ठ करुन 50 टक्क्यां आत टिकणारे आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली.

यांचा उपोषणात सहभाग
उपोषणात आंदोलनात रेखा ढोले, प्रमिला वराडे, निता पाटील, मनस्वी पाटील, प्रतिभा खोसे, वंदना पाटील, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष अनिल शालिग्राम पाटील, निवृत्ती ढोले, सुरज पाटील, रवींद्र मराठे, शरद गायकर, संजय काकडे, महेंद्र पाटील, अनिल देवकर, विशाल तांगडे, विलास सटाले, धनराज गायकवाड, शैलेश वराडे, संदीप देवकर, गोविंदा शहापूरे, समाधान बढे, बापू देशमुख, संजय वराडे, गोपाल पाटील, मनोज ठोसर, रामदास पाटील, कैलास चौधरी, विजय चौधरी, राहुल माळी सहभागी झाले. मराठा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तालुकाध्यक्ष सुपडा निकम, रीपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुकाध्यक्ष संजय तायडे व इतर राजकीय, समाजातील सर्व घटकांनी जाहीर पाठिंबा दिला.












मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !