मराठा समाज आरक्षण : न्यायालयात टिकणारे आरक्षण द्यावे ; यावलला साखळी उपोषण
Maratha Community Reservation : Reservation should be given in court ; Chain hunger strike यावल : शहरातील भुसावळ टी पॉइंट येथे मराठा समाजाला आरक्षणासाठी अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेल्या जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली. बुधवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तालुक्यातील समाज बांधव या ठिकाणी एकवटले. जोपर्यंत मनोज जरांगे पाटील यांची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत यावलला उपोषण कायम ठेवण्याचा निर्णय मराठा समाज बांधवांनी घेतला.
यांचा उपोषणात सहभाग
उपोषणामध्ये जिल्हा परीषदेचे माजी आरोग्य सभापती रवींद्र सूर्यभान पाटील, यावलचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष अजय पाटील, सचिव अतुल यादव, प्रसिद्धी प्रमुख सुनील गावडे, डी.बी.पाटील, विलास पवार, राकेश पाटील, स्वप्निल चव्हाण, भास्कर पाटील, किरण पाटील, दिनेश पाटील, अॅड.देवकांत पाटील, प्रा.मुकेश येवले, रणछोड पाटील, डॉ.हेमंत येवले, दिनकर क्षीरसागर, राकेश पाटील, रुपेश पाटील, वसंत पाटील, किरण पाटील, अजय पाटील, अनिकेत येवले आदी साखळी उपोषणाला बसले आहेत.जोपर्यंत मराठा समाजाची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत साखळी उपोषण कायम राहील असा पवित्र सकल मराठा समाज बांधवांनी घेतला आहे.










