सरकारविरोधात जनतेत रोष : आरक्षण मिळत नाही तोवर पाण्याला स्पर्श नाही : मनोज जरांगे पाटील
Rage among the people against the government : If reservation is not available, water cannot be touched : Manoj Jarange Patil आंतरवाली सराटी : मराठा समाजाला सरकार जो पर्यंत आरक्षण देत नाही तोपर्यंत पाण्याला हात लावणार नसल्याचा निर्धार मनोज जरांगे यांनी व्यक्त केला. ते म्हणाले की, सरकारविरोधात जनतेत रोष वाढत असून आरक्षणाच्या लढाईतून आता माघार नाहीच, असेही ते म्हणाले.
सरकारकडून तरुणांवर खोट्या केसेस
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, जाणून बुजून मराठा तरुण कार्यकर्त्यांवर सरकारने खोट्या केसेस दाखल केल्या जात आहेत. मराठा आरक्षण आंदोलनाचा तिसरा टप्पा उद्यापासून सुरू होईल. आंदोलनाचे सहा-सात टप्पे असतील व सरकारला आरक्षण द्यावेच लागणार असल्याचे ते म्हणाले. आरक्षण देण्यासाठी सरकारला किती अन् कशासाठी वेळ हवा आहे हे सांगावे, असे ते म्हणालेत. फडणवीस यांच्यावर त्यांनी यावेळी कठोर शब्दात टिका केली.










