मध्य रेल्वेच्या नूतन महाव्यवस्थापकपदी आर.के.यादव
RK Yadav as new General Manager of Central Railway भुसावळ : भुसावळचे तत्कालीन डीआरएम व हल्ली पुण्यातील ईरींग ट्रेनिंग सेंटरला कार्यरत आर.के.यादव यांची मध्य रेल्वेच्या नूतन महाव्यवस्थापकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश ललवाणी हे 30 नोव्हेंबर रोजी निवृत्त होत असून त्यांच्या जागी यादव यांची नियुक्तीरेल्वे बोर्डाने केली आहे.
यादव हे पूर्वी भुसावळात डीआरएम होते. त्यांच्या कार्यकाळात भुसावळ जंक्शनचा आमुलाग्र बदल झाला असून भुसावळ विभागातील रेल्वेच्या विकास कामांना त्याच्याच कार्यकाळात चालना मिळाली होती. विद्यमान महाव्यवस्थापक 30 नोव्हेंबर रोजी निवृत्त झाल्यानंतर 1 रोजी यादव हे पदभार स्वीकारतील.








