यावल तालुक्यात चंदनाच्या लाकडांची तस्करी : दोघांना अटक


Sandal wood smuggling in Yaval taluka : Two arrested  यावल : यावल-फैजपूर रोडवरून डोंगरकठोरा फाट्याजवळ दोघांना चंदनाच्या लाकडांची तस्करी करतांना दोघांना अटक करण्यात आली. संशयितांकडून 90 हजार रुपयांचे ओले चंदनाचे लाकूड जप्त करण्यात आले व यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईमुळे जळगाव जिल्ह्यातील चंदन तस्करांच्या गोटात खळबळ उडाली.

गोपनीय माहितीवरून कारवाई
यावल ते फैजपूर रस्त्यावरील डोंगरकोठारा फाट्याजवळ दोन संशयित पोलिसांना दिसल्यानंतर पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर, पोलिस उपनिरीक्षक मुजफ्फर खान, सुशील घुगे यांच्या पथकाने संशयितांची झडती घेतली असता त्यांच्याकडे असलेल्या प्लास्टिकच्या गोणीत तब्बल 89 हजार 600 रुपये किंमतीचे चंदनाचे ओलसर लाकूड मिळून आले. 28 किलो वजनाच्या चंदन लाकडाची तस्करी होत असल्याने संशयित ऋषिकेश बबन बेदरे (27, बेल्होरा, ता.बीड) व श्रावण गणपत पवार (नवगण राजुरी, जि. बीड) या दोघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याविरुद्ध सुशील घुगे यांच्या फिर्यादीवरून यावल पोलिसात भारतीय वन अधिनियम कलम व महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम लाकूड तस्करी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मुजफ्फर खान करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !