रायगड हादरले : फार्मा कंपनीतील स्फोटात सात कामगारांचा मृत्यू ; चौघे बेपत्ता


Raigad shook : Seven workers died in an explosion in a pharma company ; Four missing रायगड : गॅस गळतीनंतर केमिकलचा स्फोट होवून तब्बल सात कामगार ठार झाल्याची धक्कादायक घटना ारायगड जिल्ह्यातील महाड एमआयडीसी परीसरात शुक्रवारी सकाळी 11 वाजता घडली. ब्लू जेट हेल्थकेअर फार्मा कंपनीत सकाळी कामगार काम करीत असताना गॅस गळती होवून केमिकलचे पाठोपाठ स्फोट झाल्याने सात कामगारांचा मृत्यू ओढवला त चार कामगार बेपत्ता असून चोवीस तासानंतरही त्यांचा शोध लागलेला नाही. या दुर्घटनेत सात जण जखमी झाले आहेत.

उद्योग मंत्र्यांनी दिली भेट
भीषण स्फोटाच्या दुर्घटनेनंतर महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती जाणत चौकशीचे आदेश दिले. दरम्यान, स्फोटानंतर भीषण आग लागल्याने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !