मध्य रेल्वेच्या सरव्यवस्थापकांनी केली भुसावळातील रेल्वे रुग्णालयासह एमओएचची पाहणी


The General Manager of Central Railway inspected the MOH along with the Railway Hospital at Bhusawal भुसावळ : मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश ललवाणी यांनी शनिवारी भुसावळ विभागाचा दौरा केला. ईगतपुरी ते भुसावळ या मार्गाची पाहणी केली. तसेच त्यांनी भुसावळ येथील रेल्वे हॉस्पीटलसह एमओएच शेडला भेट देऊन तेथील कामाचा आढावा घेतला. मध्य रेल्वे विभागातील भुसावळ हे पहिले रुग्णालय आहे जेथे एचएमआयएस प्रणाली संपूर्णपणे कार्यान्वित करण्यात आली. रुग्णांचा सर्व वैद्यकीय इतिहास जसे की मागील उपचार, लैब आणि रेडिओलॉजिकल रिपोर्ट्स, रेफरल्स आदी सर्व माहिती उपलब्ध राहणार आहे, याचे उद्घाटन जीएम ललवाणी यांनी केले.

भुसावळ विभागाचा निरीक्षण दौरा
मध्य रेल्वेचे जीएम नरेश लालवाणी यांनी भुसावळ विभागात शनिवारी निरीक्षण दौरा केला. जीएम ललवाणी यांनी पुष्पक एक्सप्रेसने निरीक्षण यानमधून निरीक्षण केले. यावेळी डीआरएम ईती पांडे त्यांच्यासोबत इगतपुरी -भुसावळ दरम्यान सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. मनमाड-जळगाव तिसरी लाईनीच्या कार्याची माहिती, विभागात सुरू असलेल्या प्रवासी सुविधा संबंधित कामाची माहिती घेतली. भुसावळ येथे असलेल्या विभागीय रेल्वे हॉस्पीटल आणि विभागातील सर्व आरोग्य युनिटमध्ये रुग्णालय व्यवस्थापन प्रणाली (एचएमआयएस) हॉस्पीटल व्यवस्थापन माहिती सिस्टीम येथे लागू करण्यात आली. भुसावळ हे मध्य रेल्वे विभागमधील पहिले रुग्णालय आहे जेथे एचएमआयएस प्रणाली संपूर्णपणे कार्यान्वित केली गेली आहे, रुग्णाचा सर्व वैद्यकीय इतिहास जसे की मागील उपचार, लैब आणि रेडिओलॉजिकल रिपोर्ट्स, रेफरल्स आदी आता एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. व रुग्णाच्या मोबाईल वर देखील उपलब्ध होतील. विभागीय हॉस्पीटल येथे ही प्रणाली कार्यान्वित झाल्याने प्रशासन तथा उपचारासाठी येणार्‍या रुग्णासाठी फायदा होणार आहे. या प्रणालीचा शुभारंभ जीएम नरेश लालवानी यांच्याहस्ते करण्यात आला







एमओएच शेडमध्ये पाहणी
एमओएच शेडमध्ये पाहणी करण्यात आली तसेच पीट लाईन 20 मीटरने विस्तारणे व नव्याने बांधलेल्या इमारतींचे उद्घाटन जीएम ललवाणी यांच्याहस्ते झाले. यावेळी डीआरएम इती पांडे, एडीआरएम (प्रशासन) सुनिलकुमार सुमन, एडीआरएम (तांत्रिक) कौशलेंद्र कुमार, मुख्य वैद्यकीय अधीक्षक आनंद कांबळे तसेच विभागातील विविध अधिकारी व वरीष्ठ विभागीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !