चारीत्र्याच्या संशयातून मद्यधूंद पतीकडून पत्नीचा खून


Murder of wife by drunken husband due to suspicion of character म्हसवड : मद्यधूंद अवस्थेतील पतीने पत्नीचा खून केल्याची संतापजनक घटना म्हसवड येथे रविवारी घडली. चारीत्र्याच्या संशयातून हा प्रकार घडला असून आरोपी पतीने मद्यधूंद अवस्थेत पत्नीचे डोके भिंतीवर आपटले व रात्री बेडवर टाकले. सकाळी मुले उठल्यानंतर आई उठत नसल्याने त्यांनी शेजार्‍यांना ही बाब सांगितल्यानंतर खुनाचा उलगडा झाला. म्हसवड पोलिसात आरोपी पती धोंडीराम पुकळेविरोधात गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक करण्यात आली. दीपाली धोंडिराम पुकळे (29) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे.

मद्यधूंद पतीकडून खुन
दीपाली पुकळे हिच्या चारीत्र्यावर आरोपी धोंडीरामला संशय असल्याने त्यांच्यात खटके उडत होते व शनिवारी रात्री दाम्पत्यात भांडण झाल्यानंतर आरोपीने पत्नीला भिंतीवर आपटताच तिचा मृत्यू झाला. दीपाली ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होती. दीपाली व धोंडीराम यांना 8 व 9 वर्षांची अशी दोन मुले आहेत. पोलिसांनी शिताफीने धोंडीरामला पत्नी दीपाली हिचा खून केल्याप्रकरणी ताब्यात घेतले. उपविभागीय पोलिस अधिकारी अश्विनी शेंडगे यांनी घटनास्थळी भेट दिली. सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार भुजबळ तपास करीत आहेत.



 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !