भुसावळात रोटरी रेलसिटीतर्फे रविवारी ‘सायक्लोथोन’


भुसावळ : रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेलसिटी तर्फे भव्य सायक्लोथोन स्पर्धेचे रविवार, 9 फेब्रुवारी रोजी सकाळी सात वाजता आयोजन करण्यात आले. प्रदूषण मुक्ती आणि स्वस्थ भारत याचा संदेश देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा उपक्रमाचे सलग दुसरे वर्ष आहे. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणार्‍यानी स्वतः ची सायकल घेऊन येणे आवश्यक आहे. स्पर्धेसाठी प्रवेश प्रक्रिया मोफत असून गणवेषाची अट नाही, असे आयोजकांनी कळवले आहे.

असा आहेत स्पर्धेचा मार्ग
रविवारी सकाळी सात वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानापासून सुरुवात होईल. स्पर्धेचा मार्ग महात्मा गांधी पुतळा, महाराणा प्रताप चौक, लोखंडी पूल, पांडुरंग टॉकीज, अष्टभुजा मंदिी, हॉटेल हेवनपासून परत पांडुरंग टॉकीज, दगडी पूल घाशीलाल हॉटेलपासून परत जुना सातारा, जळगाव रोडमार्गे गांधी पुतळा, मैदान असा राहील. प्रत्येक सहभागी स्पर्धकाला नंबर दिला जाईल व लकी नंबर काढून तीन सायकल व पाच उत्कृष्ट बक्षिसे दिली जातील. या उपक्रमासाठी बक्षिसे व सायकली या एस.के.बायिक (राठी सायकल मॉल जळगाव) यांच्याकडून प्रायोजित आहेत. कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे व उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड यांच्याहस्ते करण्यात येणार आहे. सहभागासाठी नोंदणी कल्पना रसवंत, जामनेर रोड, बॉम्बे भेळ, रूपलता मेडिकल, अष्टभुजा डेअरी येथे सुरू असून अधिकाधिक स्पर्धकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन प्रोजेक्ट चेअरमन सागर वाघोदे, अध्यक्ष अनिकेत पाटील, सचिव मनोज सोनार यांनी केले आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !