चोपडा मंडळाधिकार्‍यासह खाजगी पंटर जळगाव एसीबीच्या जाळ्यात


वाळू वाहतुकीदरम्यान ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी आठ हजारांची लाच मागितली : चोपड्यात तीन दिवसानंतर सलग दुसर्‍या कारवाई लाचखोरांचे दणाणले धाबे

जळगाव : वाळू वाहतुकीदरम्यान ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी दरमहा आठ हजार रुपये लाचेची मागणी करणार्‍या चोपडा मंडळाधिकार्‍यांना जळगाव एसीबीच्या पथकाने शुक्रवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास खाजगी पंटरासह अटक केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. राजेंद्र आधार वाडे (50, आंबेडकर नगर, चोपडा, जि.जळगाव) व खाजगी पंटर समाधान रमेश मराठे (24, रा.पाटील गढी, चोपडा, , जि.जळगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. विशेष म्हणजे तीन दिवसांपूर्वीच शेतीच्या मृत्यू पत्रान्वये बाजूने निकाल देण्यासाठी 15 हजारांची लाच मागणार्‍या चोपडा नायब तहसीलदार जितेंद्र मच्छिंद्रनाथ पंजे (46, रा.आदर्श नगर, विश्वकर्मा सोसायटीजवळ, जळगाव) सरलाच घेताना जळगाव एसीबीच्या पथकाने बुधवारी सायंकाळी लाच घेताना रंगेहाथ अटक केली होती. सलग दुसरी कारवाई चोपड्यात झाल्याने लाचखोरांचे धाबे दणाणले आहे.

मंडळाधिकार्‍याला भोवली लाच
चोपडा तालुक्यातील 25 वर्षीय तक्रारदाराचे ट्रॅक्टर असून या ट्रॅक्टरवर वाळू वाहतूकी दरम्यान कारवाई न करण्याच्या मोबदल्यात दरमहा हप्ता आठ हजार रुपयांप्रमाणे देण्याची मागणी आरोपी मंडळाधिकारी वाडे याने शुक्रवारी आठ हजारांची लाच मागितली होती. तक्रारदाराने या संदर्भात जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर सापळा रचण्यात आला. विशेष म्हणजे शुक्रवारी मध्यरात्री 12.30 वाजेनंतर आरोपीने लाच स्वीकारताच त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या.

यांच्या पथकाने केला सापळा यशस्वी
ही कारवाई पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलिस निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक जी.एम.ठाकुर, पोलिस निरीक्षक निलेश लोधी व संजोग बच्छाव, एएसआय रवींद्र माळी, हवालदार अशोक अहिरे, हवालदार सुरेश पाटील, सुनील पाटील, नाईक मनोज जोशी, सुनील शिरसाठ, जनार्दन चौधरी, प्रशांत ठाकुर, प्रवीण पाटील, नासीर देशमुख, महेश सोमवंशी, ईश्वर धनगर आदींच्या पथकाने केली.
्र्र





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !