खड्डे झुगारत ‘सायक्लोथॉन’ स्पर्धेत भुसावळाकरांचा उत्स्फूर्त सहभाग


पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश : आमदार संजय सावकारेंनी वाढवला स्पर्धकांचा उत्साह

भुसावळ : भुसावळातील खड्ड्यांना झुगारत रोटरी रेल सिटीच्या रविवारी झालेल्या सायक्लोथॉन स्पर्धेत भुसावळकर सहभागी झाले. रोटरी रेल सिटीतर्फे रविवारी पहाटे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर सायक्लोथॉन स्पर्धेला पहाटेच्या आल्हाददायी वातावरणात सुरूवात झाली. खासदार रक्षा खडसे, नगराध्यक्ष रमण भोळे यांनी हिरवी झेंडी दाखवली.

यांची होती उपस्थिती
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान, शहर पोलिस ठाणे, महाराणा प्रताप चौक, लोखंडी पूल, जामनेर रोड तसेच हॉटेल हेवन येथून वळसा घालून दगडी पूला खालुन घाशीलाल हॉटेल, दशमेश मार्गाने येऊन पुन्हा मैदानावर रॅलीचा समारोप झाला. या प्रसंगी आमदार संजय सावकारे, कर्नल करुण ओहरी, एस. के. बाईकचे प्रमुख प्रवीण मुळे, किशोर महिरे, राठी सायकल मॉलचे मोहनकुमार दर्डा, रोटरीचे प्रांतपाल चेतन पाटील, रेल सिटीचे अध्यक्ष अनिकेत पाटील, सचिव मनोज सोनार, प्रोजेक्ट चेअरमन सागर वाघोदे आदी उपस्थित होते.

लकी ड्रॉने सायकल वितरण
सहभागी स्पर्धकांना दिलेल्या क्रमांकांचा लकी ड्रॉ काढण्यात आला. त्यात ऋत्विक फालक, सार्थक पाटील, प्रा.प्रवीण पाटील या विजेत्यांना एस. के. बाईकतर्फे सायकली बक्षीस देण्यात आल्या. गोव्याच्या बीचवरुन 250 किमी अंतराचा खडतर प्रवास सायकलने पूर्ण केल्याबद्दल डॉ.नीलेश भिरुड यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

आमदारांनी वाढवला स्पर्धकांचा उत्साह
प्रदूषणमुक्तीचा संदेश आपल्या कृतीतून देण्याच्या उद्देशाने आमदार संजय सावकारे सायकलने मैदानावर पोहोचले. आमदार सावकारे यांनी सहा किमीचा टप्पा पूर्ण केला तसेच ते सायकलनेच घरी परत गेले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !