सावदा पालिकेला मिळाले पूर्णवेळ मुख्याधिकारी : हर्षल सोनवणे उद्या पदभार घेणार


Savada Municipality gets full-time chief executive : Harshal Sonwane will take charge tomorrow सावदा : सावदा नगरपालिकेचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांची पारोळा येथे बदली झाल्यानंतर जवळपास एक महिना येथे प्रभारी मुख्याधिकारी म्हणून समीर शेख हे कार्यभार पाहत आहे. कायमस्वरूपी मुख्याधिकारी असावेत जेणे करून कामे गतिमान पद्धतीने होतील, अशी मागणी अनेक दिवसांपासून होती. आता सावदा पालिकेसाठी धारणी जि.अमरावती येथून हर्षल सोनवणे यांनी नियुक्ती येथे झाली आहे. मंगळवार, 5 रोजी आपला कार्यभार हाती घेणार आहेत. आता नगर पालिकेची कामे अधिक गतिमान पद्धतीने होती, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


कॉपी करू नका.