भुसावळात उद्या सब ज्युनियर थ्रो बॉल जिल्हा निवड चाचणी स्पर्धा


भुसावळ : जळगाव जिल्हा थ्रो बॉल संघटनेच्या संयुक्त विद्यमाने शहरातीलय ावल रोडवरील सेंट अलॉयसीस स्कूलमध्ये सब ज्युनियर गटातील मुला-मुलींची जिल्हा संघ निवड चाचणी स्पर्धा मंगळवार, 11 फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता होत आहे. जिल्ह्यातील खेळाडूंनी उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांनी केले असून अधिक माहितीसाठी प्रा.डॉ.संजय चौधरी, बी.एन.पाटील, मेघशाम शिंदे, राजू कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधावा, असे जळगाव जिल्हा थ्रोबाल संघटनेचे सचिव डॉ.प्रदीप तळवलकर यांनी कळविले आहे. दरम्यान, थ्रो बॉल सब ज्युनियर राज्य स्पर्धा शिर्डी, जि.अहमदनगर येथे 14 ते 16 फेब्रुवारी दरम्यान होत आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !