डेक्कन एक्स्प्रेसखाली आत्महत्या केलेल्या अनोळखीची ओळख पटेना


भुसावळ : डेक्कन एक्स्प्रेसखाली झोकून देत 35 वर्षीय अनोळखी इसमाने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी, 7 रोजी सकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास चाळीसगावातील प्लॅटफार्म क्रमांक तीनवरील कॅन्टीनसमोर घडली होती. या प्रकरणी चाळीसगाव लोहमार्ग पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. अनोळखी इसमाची अद्यापपर्यंत ओळख पटलेली नाही. उंची 5.5 फूट, रंग सावळा, शरीर बांधा सडपातळ, चेहरा गोल, नाक बसके, डोळे लहान काळे, मूछ बारीक तसेच उजव्या हाताच्या पोटलीवर फुल गोंदलेले असून अंगात फुलबाहीचा शर्ट व काळ्या रंगाची फुल पँट आहे. ओळख पटत असल्यास चाळीसगाव लोहमार्ग पोलिस ठाण्याच्या एएसआय पुष्पा रामटेके (9049953140) वर संपर्क साधावा, असे कळवण्यात आले आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !