स्व.बी.सी.बियाणी स्मृती चषकावर जळगाव (अ) संघाची मोहर


भुसावळ : माहेश्वरी समाज ,माहेश्वरी तहसील सभा तसेच माहेश्वरी युवा संगठन, भुसावळतर्फे बियाणी एज्युकेशन ग्रुपद्वारा प्रायोजित स्व.बी.सी.बियाणी स्मृती चषकाचे नुकतेच आयोजन करण्यात आले. माहेश्वरी क्रिकेट चॅम्पियनशीप जिल्हास्तरीय माहेश्वरी समाज क्रिकेट स्पर्धेत जळगाव, पाळधी, कासोदा, भुसावळ येथील क्रिकेट संघ सहभागी झाले. अंतिम सामना जळगाव (अ ) विरुद्ध जळगाव (ब) संघात झाला व त्यात जळगाव अ संघाने स्व.बी.सी.बियाणी स्मृती चषक पटकावला. उत्कृष्ट फलंदाज म्हणून राहुल झवर, उत्कृष्ट गोलंदाज म्हणून स्मितेश बिर्ला, म्यान ऑफ द मॅच केतन पोरवाल यांना गौरवण्यात आले.

विजेत्या-उपविजेत्या संघाचा गौरव
विजेत्या-उपविजेत्या संघाला कांताबाई बियाणी, मनोज बियाणी, संगीता बियाणी, शंकरलाल झंवर, द्वारकादास दरगड, प्रवीण भराडीया, घनश्याम मंडोरे, वरीष्ठ महिला मंडळ अध्यक्ष अयोध्याबाई मंत्री, महिला मंडळ अध्यक्ष मनीषा काबरा यांच्या हस्ते चषक व मेडल देवून गौरवण्यात आले. स्पर्धा यशस्वीतेसाठी प्रकल्प प्रमुख सुनील हेडा, चेतन भराडीया, यश हेडा, आशिष आगीवाल यांच्यासह मयुर नागोरी, संजय लाहोटी, सर्वेश लाहोटी, सचिन हेडा, माहेश्वरी समाजाचे तहसील सभाचे, युवा संघटनाचे सर्व सदस्यांनी परीश्रम घेतले. पंच एच.एन.पाटील, विपुल नारखेडे, सर्वेश शिंदे, स्वप्नील पाटील, समालोचक रुद्रसेन गंठीया, स्कोअरर शैलेश बावणे यांना मान चिन्ह देवून सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन रवींद्र तायडे तर आभार प्रदर्शन डी.एम.पाटील यांनी मानले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !