आमदार चंद्रकांत पाटलांच्या प्रयत्नांना यश : बोदवडमधील घरकुलांचा प्रश्‍न मार्गी


बोदवड : शहरातील गट क्रमांक 579/2 व 580/2 मधील प्रभाग क्रमांक 16, 17 आणि आठमध्ये येत असलेल्या स्वामी विवेकानंद नगर, बजरंग पुरा, मन्यार वाडा भागातील रहिवाशांना घरकुलाच्या लाभासाठी मोजणी सीट किंवा सिटी सर्वेचा उतारा आवश्यक असल्याने व त्यांना तो मिळत नसल्याने गेल्या अनेक दिवसांपासून येथील लाभार्थी घरकुल लाभाच्या प्रतीक्षेत होते. या संदर्भात आमदार चंद्रकांत पाटील यांनी प्रयत्न केल्यानंतर लाभार्थींच्या घराच्या जागा मोजणीला सुरुवात झाज्याने समाधान व्यक्त होत आहे.

444 अर्जदारांच्या पाठपुराव्याला यश
शांताराम रामकृष्ण कोळी यांच्या समवेत असलेल्या 444 अर्जदाराच्या पाठपुराव्याला यश आले असून भूमी अभिलेख कार्यालयाकडून शहरातील स्वामी विवेकानंद नगर, बजरंग पुरा, मन्यार वाडा येथील 36 घरकुल लाभार्थ्यांच्या घरांच्या जागेच्या मोजणीला सुरुवात झाली आहे.
नगरपंचायतीच्या माध्यमातून घरकुल लाभ व इतर शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी संबंधित कागदपत्रांनी कायम आवश्यकता भासत असते.त्यामुळे ही आवश्यक कागदपत्रे संबंधित रहिवासी यांच्याकडे नसल्याने गेल्या दिड वर्षांपासून ते घरकुल लाभ व इतर शासकीय योजनांपासून वंचित होते. याबाबत येथील शांताराम कोळी व येथील 444 अर्जदारांनी याबाबत वारंवार पाठपुरावा करून आंदोलन करीत संबंधित समस्या आमदार पाटील यांच्याकडे मांडली. याची दखल घेत आमदार पाटील यांनी संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांना सुचना करीत हा प्रश्न मार्गी लावला.
गेल्या दिड वर्षांपासून प्रलंबित असलेला हा विषय मार्गी लावल्याबद्दल आमदार पाटील यांचे आभार मानले आहेत. या पाठपुराव्यासाठी शंकर सोनार, गोपाळ पाटील, भास्कर गुरचळ, राजु बडगुजर, संजय माळी, धनराज माळी, नाना नेरकर, निलेश माळी, समशेर भाई, साठे बुवा, राजु सुर्यवंशी, नईम बागवान, नाजीम पिंजारी, गणेश पाटील, विश्वनाथ घाटे, सुनील सुर्यवंशी, निरंजन चंदनकार, गुलाब मुलतानी, अब्दुल पिंजारी, गजानन भोई, अशोक कोळी, गुलाब ठेकेदार, विलास मराठे आदींचे सहकार्य लाभले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !