जेसीआय चाळीसगाव सीटी अध्यक्षपदी मुराद पटेल
सचिवपदी हर्षल चौधरी यांची निवड : मावळत्या अध्यक्षांच्या उपस्थितीत शपथविधी
चाळीसगाव : जेसीआय चाळीसगाव सिटी सन 2020 या वर्षाकरिता अध्यक्षपदी जेसी मुराद पटेल तर सचिवपदी जेसी हर्षल चौधरी यांची निवड करण्यात आली. यावेळी 2019 चे मावळते अध्यक्ष जेसी अफसर खाटीक यांनी मुराद पटेल यांना शपथविधी दिला.
यांची प्रमुख उपस्थिती
प्रमुख पाहुणे म्हणून आमदार मंगेश चव्हाण, चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड, झोन अध्यक्ष निर्मल मुनोत, झोन उपाध्यक्ष चेतन पाटील, माजी अध्यक्ष गजानन मोरे, संजय पवार, सचिन पवार, निलेश गुप्ता, चंद्रकांत ठोंबरे, आण्णा धुमाळ, खुशाल पाटील, नितीन परदेशी, सुरेश तलरेजा, सुनील बंग, संजय मोरे, हरेश जैन, बाळाप्रसाद राणा, कार्यकारीणी उपाध्यक्ष व सदस्य डॉ.प्रसन्न अहिरे, दिनेश चव्हाण, मयूर अमृतकार, धर्मराज खैरनार, अॅड.सागर पाटील, आशुतोष खैरनार, साहिल दाभाडे, कल्पेश राणा, योगेश पाटील, सुशील सोनवणे, सुवालाल सूर्यवंशी, रावसाहेब जगताप, प्रवीण मोरे, जगदीश पटेल, आरीफ खाटीक, हेमंत देवरे, प्रशांत चौधरी, विजय गायकवाड उपस्थित होते. सूत्रसंचालन रावसाहेब जगताप तर आभार हर्षल चौधरी यांनी मानले.



