अकलूदला प्रॉपर्टी ब्रोकर्सच्या घरातून 11 लाखांचा ऐवज लांबवला


11 lakh compensation was extended to Aklud from the house of property brokers यावल : यावल तालुक्यातील अकलूद गावातील प्रॉपर्टी ब्रोकरच्या घरातून चोरट्यांनी सुमारे 11 लाखांचा ऐवज लांबवल्याचा प्रकार उघडकीस आल्याने गावात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी ही चोरी केली.

बंद घर चोरट्यांना पर्वणी
अकलूद गावात राजेश गुनधरजी नखाते (जैन) हे वास्तव्यास असून ते प्रॉपर्टी ब्रोकर आहेत. सेमिनारनिमित्त ते मुंबईत गेल्यानंतर त्यांच्या सौभाग्यवती अकोल्याला गेल्याने घर बंद होते. चोरट्यांनी ही संधी हेरत सोन्या-चांदीचे दागिने व पाच लाखांची रोकड मिळून 11 लाख सात हजार 900 रुपयांचा मुद्देमाल लांबवला.



सोमवार, 29 जानेवारी रोजी राजेश नखाते हे आपल्या मुलीसह मुंबई येथून अकलूदला आल्यानंतर घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक जालिंदर पळे यांच्यासह सहकार्‍यांनी धाव घेत पाहणी केली.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !