दोन लाखांची लाच भोवली : सहाय्यक पोलिस निरीक्षकाला पोलिस ठाण्यातच पडल्या बेड्या


Bribe of two lakhs : Assistant police inspector was shackled in the police station itself नारपोली : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला मदत करण्यासह चार्जशीट पाठवताना सहकार्य करण्याच्या मोबदल्यात तडजोडीअंती दोन लाखांची लाच घेताना नारपोली, भिवंडी, ठाणे पोलिस ठाण्याच्या सहाय्यक निरीक्षकाला ठाणे एसीबीने बेड्या ठोकल्या. शरद बबन पवार (37) असे अटकेतील सहाय्यक निरीक्षकाचे नाव आहे.

असे आहे लाच प्रकरण
38 वर्षीय तक्रादार यांच्या मुलावर खुनाचा आरोप असून त्यास अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक निरीक्षक शरद पवार यांच्याकडे आहे. अटकेतील आरोपीला सर्व प्रकारे मदत करण्यासह चार्जशीट पाठविताना सहकार्य करण्याचे सांगून पाच लाखांची लाच पवार यांनी 29 रोजी मागितली व दोन लाखात जडजोड करण्यात आली. मंगळवार, 30 रोजी दुपारी शरद पवार यांनी पोलिस ठाण्यातच आपल्या कॅबीनमध्ये लाच स्वीकारताच त्यांना अटक करण्यात आली.



यांनी केला सापळा यशस्वी
पोलिस उपअधीक्षक माधवी राजेकुंभार, एस.आर.खान, एम.ए.बजागे, एम.ए.तेटंबे, चालक चौधरी आदींनी हा सापळा यशस्वी केला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !