मुंबई सेंट्रल व साईनगर शिर्डी गाडीला मुदतवाढ
Extension of Mumbai Central and Sainagar Shirdi Gadi भुसावळ : रेल्वे प्रवाशांची अतिरीक्त गर्दी लक्षात घेता मुंबई सेंट्रल- भुसावळ व तिरुपती-साईनगर शिर्डी गाडीला मुदतवाढ देण्यात आली आहे. ट्रेन क्रमांक 09051 मुंबई सेंट्रल-भुसावळ या गाडीला आता 27 फेब्रुवारीपर्यंत तर ट्रेन क्रमांक 09052 भुसावळ- मुंबई सेंट्रल त्री-साप्ताहिक विशेष अधिसूचित 28 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
गाडी क्रमांक 07637 तिरुपती-साई नगर शिर्डी साप्ताहिक विशेष गाडीला आता 31 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे तर 07638 साई नगर शिर्डी-तिरुपती साप्ताहिक विशेष 1 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. गाडी क्रमांक 07115 हैदराबाद -जयपूर साप्ताहिक विशेष गाडीला 29 मार्चपर्यंत तर 07116 जयपूर-हैदराबाद साप्ताहिक विशेष गाडीला 31 मार्चंत पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.








