वाघोड शेती-शिवारातून 50 हजारांच्या ठिबक नळ्या लांबवल्या


रावेर : तालुक्यातील वाघोड शेती-शिवारातून सुमारे पन्नास हजार रुपये किंमतीच्या ठिबक नळ्या व मिनी स्प्रिंकलर चोरून नेल्याची घटना नुकतीच घडली. याबाबत अज्ञात चोरट्यांविरुद्ध रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. शुक्रवार, 14 फेबु्रवारीच्या रात्री वाघोड शिवारातील गट क्रमांक 456 व गट क्रमांक 402 या शेतातून अनुक्रमे जैन कंपनीचे मीनी स्प्रिंकलर 16 एम.एम.ठिबक नळ्या, 1500 मीटर नळीची स्प्रिंकलर फुलनारे 150 नळ्या तर दुसर्‍या शेतातून नेटाफिम व जैन कंपनीच्या नागार्जुन ठिबक नळ्या चोरण्यात आल्या. याबाबत सुरेश लक्ष्मण पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्ह्याची नोंद रावेर पोलिस ठाण्यात करण्यात आली. तपास हवालदार अर्जुन सोनवणे करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !