मुंबईतील माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण : उद्धव ठाकरेंच्या आरोपानंतर राज्यात खळबळ


Former corporator Abhishek Ghosalkar murder case in Mumbai : After Uddhav Thackeray’s allegations, there is a stir in the state
मुंबई :
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुंबईतील माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्या झाल्यानंतर राज्यात खळबळ उडाली असतानाच आता राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परीषदेत केलेल्या दाव्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. मॉरीस यानेच अभिषेक घोसाळकरवर यांची गोळ्या घालून हत्या केली आणखी कुणी गोळ्या चालवल्या ? त्या दोघांनाही मारण्याची सुपारी दुसर्‍या कुणी दिली होती का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केल्यानंतर या प्रकरणाचा गुंता वाढल्याचे बोलले जात आहे.

पोस्ट मार्टेम रीपोर्टमध्ये चार गोळ्या लागल्याचे निष्पन्न
अभिषेक घोसाळकर यांना तीन गोळ्या लागल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचं याआधी सांगितलं जात होतं. मात्र प्रत्यक्षात त्यांच्या शरीरात चार गोळ्या घुसल्या होत्या, असं पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून स्पष्ट झालं आहे. त्यानंतर अतिरक्तस्त्राव आणि हॅमरेज शॉक यामुळे घोसाळकर यांचा मृत्यू झाल्याचं जे. जे. रुग्णालयातील पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

ठाकरेंच्या आरोपाने खळबळ
मुंबईत पत्रकार परीषद घेत उद्धव ठाकरे यांनी राज्यातील बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेवर बोट ठेवले. अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येबद्दल बोलताना ते म्हणाले की, अभिषेक घोसाळकरवर गोळ्या मॉरिसने चालवल्या की आणखी कुणी चालवल्या? त्या दोघांनाही मारण्याची सुपारी आणखी कुणी दिली होती का? कारण ज्याने हत्या केली त्यानेही नंतर आत्महत्या केली. हे प्रकरण जेवढं दिसतंय तेवढं सोपं नाही. सूड भावनेतून माणूस अत्यंत टोकाचं पाऊल उचलतो. त्याने हत्या करण्याचं टोकाचं पाऊल उचललं असेल तर त्याने आत्महत्या का केली हा प्रश्न राहतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले.


कॉपी करू नका.