नाशिक खुनाने हादरले : किरकोळ वादातून रीक्षा चालकाचा खून


Nashik rocked by murder: Rickshaw driver killed over petty dispute नाशिक : अंबड पोलिस ठाणे हद्दीत चुंचाळे भागात शनिवारी रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास रीक्षा चालक शंकर गाडगीळ (35, रा.घरकुल वसाहत) याची हत्या करण्यात आली. याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली.

किरकोळ वादातून घडली हत्या
किरकोळ वादातून शनिवारी दुपारी शाब्दिक चकमक चौघांमध्ये झाली होती. शंकर गाडगीळ व आरोपी हल्लेखोर सोनू नवगिरे, सोनू कांबळे, महेंद्र कांबळे यांचा काही तरी किरकोळ कारणावरून वाद झाला होता. हा वाद त्यावेळी मिटला मात्र तिघांनी डोक्यात राग धरून रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास शंकर यास एकटे गाठले. त्यांच्यामध्ये पुन्हा दुपारच्या घटनेवरून बाचाबाची होऊन शिवीगाळ करत मारहाण सुरू झाली. यावेळी तिघांपैकी कोणीतरी एकाने रोड डोक्यात टाकल्याने शंकर रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. त्याला गंभीर जखमी अवस्थेत शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासून मयत घोषित केले. घ



चुंचाळे एमआयडीसी पोलीस चौकीचे आधिकारी, कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. गुन्हे शोध पथकाने हल्लेखोरांची ओळख पटवून तपासाची चक्रे फिरवली. अवघ्या अर्ध्या तासात तिघा संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !