पैसे खर्च केल्यानंतर वडिल रागावले : मुलाने केली आत्महत्या
जळगाव : वडिल रागावल्यानंतर मुलानेच आत्महत्या केल्याची घटना वराड, ता.जळगाव येथे घडली. या घटनेत आकाश बाळू ठाकरे (23, रा. खडके चौक, शिवाजी नगर, जळगाव) या तरुणाचा मृत्यू झाला. कुटुंबाने लग्नासाठी जमवलेले पैसे आकाशने खर्च केल्याने त्याच्या वडिलांनी त्यास रागावल्यानंतर त्याने सोमवारी सकाळी सात वाजेपूर्वी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास शिवदास चौधरी करीत आहेत.


