सुप्रीम कंपनीच्या चेअरमनसह 27 जणांविरुद्ध गुन्हा
बनावट दस्तावेजाद्वारे केली गुणवत्ता अधिकार्याची फसवणूक : एमआयडीसी पोलिसांकडून तपासाला सुरुवात
जळगाव : खोट्या व बनावट दस्तावेजाचा आधार घेत गुणवत्ता अधिकार्याची फसवणूक सुप्रीम कंपनीच्या चेअरमनसह संचालक, कार्यकारी संचालक, सी.ए. आदींच्या चांगलीच अंगलट आली असून एकूण 27 जणांविरुद्ध सोमवारी रात्री 11 वाजता एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. प्रमोद बालकिसन मंत्री (49, रा.शिवराणा नगर, जळगाव) यांच्या फिर्यादीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांच्याविरुद्ध दाखल झाला गुन्हा
सुप्रीम इंडस्ट्रीजचे चेअरमन बी.एल.तापडिया, कार्यकारी संचालक एम.पी.तापडीया, वरीष्ठ उपाध्यक्ष जे.एम.तोतला, संचालक एस.जे.तापडिया, व्ही.के.तापडिया, बी.व्ही.भार्गव, ई.बी.देसाई, एच.एस.पारेख, एन.एस.खंडेलवाल, एस.आर.तापडिया, वाय.पी.त्रिवेदी यांच्यासह महाव्यवस्थापक जी.के. सक्सेना, संजय यशवंत प्रभुदेसाई, व महाव्यवस्थापक शकील अहमद शेख, व्यवस्थापक ए.एस.मुळे, सतीश भगीरथ सोमानी, सुरेश मंत्री, अनिल काशिनाथ काबरा, राजू कोठारी, अतुल लठ्ठा, मनिष पाठक, महेश एम.पाटील, अशोक मोगरे, जितेंद्र बडगुजर, जे.एच.चौधरी व एच.एन.जैन आदींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किमान वेतन, शासनाकडे जमा करावयाची प्रॉव्हीडंट फंडाची रक्कम, ग्रॅज्युटी, बोनस व निवृत्ती वेतन यात खोटे व बनावट कागदपत्रे बनवून ते खरे असल्याचे भासविल्याचा आरोप उभयंतांवर आहे.



