माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे हृदयविकाराने निधन


Former Chief Minister Manohar Joshi passed away due to heart failure मुंबई : शिवसेनेच्या पहिल्या फळीतले नेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे शुक्रवारी पहाटे तीन वाजता वयाच्या 86 व्या वर्षी गुरुवारी रात्री हृदयविकाराने निधन झाले. मनोहर जोशी यांना हृदयविकाराचा त्रास होताच त्यांना हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली आहे. त्यांच्या निधनाने राजकीय वर्तुळावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, बुलढाणा दौर्‍यावर आलेले माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने मुंबई गाठले आहे.

बाळासाहेब ठाकरेंचे निकटवर्तीय
शिवसेनेचे संस्थापक दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या निकटवर्तीयांपैकी जोशी होते. विधान परीषद आमदार, मुंबईचे महापौर, विरोधी पक्षनेते आणि शिवसेनेचे पहिले वहिले मुख्यमंत्री म्हणून अनेक पदे मनोहर जोशी भूषवली होती. गेल्या अनेक दिवसांपासून प्रकृती खराब असल्याने ते महाराष्ट्राच्या राजकारणापासून अलिप्त होते.

त्यावेळी दिला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा
1998 मध्ये युती सरकारच्या काळात मनोहर जोशी राज्याचे मुख्यमंत्री होते. तेव्हा पुण्यात कर्वे रोडसारख्या प्राईम एरिआत त्यांचे जावई गिरीश व्यास यांना इमारत बांधायची होती. पण भूखंड शाळेसाठी आरक्षित होता. जेव्हा या इमारतीसंबंधीची फाईल जोशींसमोर आली तेव्हा मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे जावई गिरीश व्यास यांच्यासाठी पुण्यातील शाळेसाठी आरक्षण असलेल्या भूखंडाचे आरक्षण बदलल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.

त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एक चिठ्ठी वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी धाडली. मनोहर जोशी यांनी आधी राज्यपाल पी. सी. अलेक्झांडर यांच्याकडे राजीनामा सुपूर्द करावा आणि मगच मला भेटायला यावे, असा निरोप बाळासाहेबांनी पाठवला. हा निरोप मिळताच क्षणाचाही विलंब न करता जोशींनी राज्यपाल अलेक्झांडर यांच्याकडे राजीनामा दिला.

 


कॉपी करू नका.