लग्नवाढदिवसाचे औचित्य साधून मित्रांच्या स्नेहाची ‘गुंफण’


भुसावळातील विघ्नहर्ता पब्लिकेशनचे संचालक रवीभाऊ निमाणी व सौ.सरला निमाणींवर शुभेच्छांचा वर्षाव

भुसावळ : विवाह म्हणजे दोन जिवांचे मिलन अन् आयुष्यभराचा सहप्रवासही…! अशाच आयुष्यभराच्या प्रवासातील विवाहाची 18 वर्ष पूर्ण करणार्‍या भुसावळातील विघ्नहर्ता पब्लिकेशनचे संचालक रवीभाऊ निमाणी व सौ.सरला निमाणींवर जिल्हाभरातील त्यांच्या मित्र परीवाराने आवर्जून उपस्थिती देत शुभेच्छांचा वर्षाव केला. औचित्य लग्नवाढदिवसाचे असलेतरी निमाणी यांनी या छोटेखानी कार्यक्रमातून आपल्या मित्र परीवारातील स्नेहाची गुंफणही केली.

मित्रांच्या स्नेहाची केली ‘गुंफण’
सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, व्यावसायीक यासह विविध क्षेत्रातील निमाणी परीवारावर प्रेम करणार्‍या मित्र मंडळींनी सहपरीवार स्टार लॉनमध्ये सोमवारी रात्री झालेल्या कार्यक्रमास आवर्जून हजेरी लावली. याप्रसंगी उपस्थित कपलसाठी काही गेम शो देखील घेण्यात आले. याच कार्यक्रमात रवीभाऊ निमाणी यांच्या भगिनी मंजू दोशी व मेहुणे नरेंद्र दोशी यांच्या लग्नाला 17 वर्ष पूर्ण झाल्याने उपस्थितांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.

यांनी उपस्थित राहून दिले आशीर्वाद
आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, पारोळा नगराध्यक्ष करण पवार, साकळीचे छोटू बाबा, सावद्याचे राजेश वानखेडे, रेखा वानखेडे, संजय सुराणा, भाजपा संघटन सरचिटणीस प्रा.सुनील नेवे, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सावकारे, भुसावळातील प्रख्यात सी.ए.तथा नगरसेवक दिनेश राठी, नगरसेवक पिंटू कोठारी, पिंटू ठाकूर, मनोज बियाणी, मुकेश पाटील, नगरसेवक युवराज लोणारी, अ‍ॅड.बोधराज चौधरी, निक्की बत्रा, नगरसेविका कविता चौधरी, अजय नागराणी, देवा वाणी, सतीश सपकाळे, दिनेश नेमाडे, परीक्षीत बर्‍हाटे, गिरीश महाजन, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन धांडे, चोपडा नगरसेवक रवी पाटील, वरणगावचे नगरसेवक बबलू माळी, कठोरा सरपंच प्रशांत पाटील, जिल्हा परीषदेचे माजी सदस्य समाधान पवार, अमळनेरचे सुनील चौधरी, वरणगावचे डॉ.नि.तु.पाटील, चोपड्याचे डॉ.प्रणय वाणी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थितीत देत निमाणी परीवारावर शुभेच्छांचा वर्षाव केला.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !