रावेरात निर्दयतेने गुरांची वाहतूक : 18 म्हशींची पोलिसांकडून सुटका
Ruthless cattle traffic in Ravera : 18 buffaloes rescued by police रावेर :l रावेर पोलिसांनी कत्तलीसाठी जाणार्या 18 म्हशींची सुटका करीत आयशर चालकास अटक करून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. रावेर-पाल रस्त्यावर अवैधरीत्या म्हशींची वाहतूक करणारा आयशर (ट्रक क्रमांक एम.एच.18 बी.झेड. 8484) पकडल्यानतंर त्यात अत्यंत निर्दयतेने व कोंबून तसेच दोरीने घट्ट बांधून म्हशींची वाहतूक सुरू असल्याचे दिसून आले.
आयशर चालकाविरोधात गुन्हा
पोलिसांनी आयशर ताब्यात घेत त्यातील 18 म्हशींची सुटका करीत त्यांची गो शाळेत रवागनी केली. चार लाख 50 हजार रुपये किंमतीच्या म्हशी तसेच पाच लाख रुपये किंमतीचा आयशर ट्रक पोलिसांनी जप्त केला. पोलीस कॉस्टेबल मुकेश मेढे यांनी रावेर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी वरून महाराष्ट्र पशुसंवर्धन कायद्यान्वये मुस्तफाखान अयुबखान (23, बालसमद, ता.कसरावद, जि.खरगोन, मध्यप्रदेश) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार जगदीश पाटील करीत आहेत.

