वाघोड-रावेरदरम्यान रेल्वेतून पडल्याने अनोळखी युवकाचा मृत्यू


An unidentified youth died after falling from the train between Waghode-Raver रावेर : रावेर तालुक्यातील वाघोड ते रावेर रेल्वे स्टेशन दरम्यान कुठल्यातरी धावत्या रेल्वेतून पडल्याने एका अनोळखी युवकाचा मृत्यू झाला. याबाबत रावेर पोेलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

शनिवारी दुपारी 3.20 वाजेपूर्वी वाघोड ते रावेर स्टेशन दरम्यान अनोळखी 30 ते 35 वयाच्या युवकाचा मृतदेह खांबा क्रमांक 486-28 डाऊन रेल्वे लाईनजवळ आढळून आला. याबाबत रावेर रेल्वे स्टेशन उपअधीक्षक विजयपाल वाल्मिकी यांनी खबर दिल्यावरून रावेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक तुषार पाटील करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !